माती-शेणखताचा गोळा करून लावल्या बिया 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्याने सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहराला ग्रीन ठेवण्यासाठी सेव्ह ऑक्‍सिजन ग्रुपतर्फे शहरातील विविध भागात बीज रोपणाच्या कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. माती-शेणखतच्या गोळ्याच्या माध्यमातून या ग्रुपतर्फे रविवारी (ता.26) सिडकोतील ग्रीन बेल्टमध्ये बिजरोपण केले. 

ग्रुपतर्फे पर्यावरणपुरक कामे अनोखे उपक्रम हाती घेण्यात येते. आगमी तीन महिने ही बिजरोपणाची मोहिम शहरातील विविध भागात सुरु ठेवण्यात येणार आहे. ग्रुपतर्फे रविवारी सिडको बसस्थानक ते एसबीआय बॅंकेचे ट्रेनिग सेंट्रर दरम्याच्या हरित पट्ट्यात माती-शेणखाताच्या गोळ्यातून जांभळी, लिंब, रामफळ, सिताफळ यासह विविध फळाच्या बियांची लागवड करण्यात आली. यात दोनशे गोळ्याच्या माध्यमातून बिजरोपणाचा पहिला टप्पा पार पडला. यासह आठवड्याभरात साई टेकडीसह शहरातील मोकळ्या जागेत पुढील बिजरोपणाचा टप्पा घेण्यात आला, अशी माहिती संतोष काटे यांनी दिली. या उपक्रमात सेव्ह ऑक्‍सीजन ग्रुपचे ऋषीकेश गुंजाळ, ओमंकार जगताप, अस्मित कोठवले, संदीप भोसले, अभिजित दांडगे, विजय पांडळे यांनी सहभाग घेतला. 

बिजरोपण कार्यक्रमात बिया टाकल्यानंतर ते पक्षी आणि इतर प्राणी खातात. यामूळे माती आणि शेणखत यांचे मिश्रण केलला मातीचा गोळ्यात या बिया आम्ही टाकतो. यामूळे बिया सुरक्षित असतात. यामूळे आम्ही या पद्धतीने बियाचे रोपण करतो. तीन महिने हा उपक्रम चालविणार आहोत. 
- संतोष काटे, सदस्य, सेव्ह ऑक्‍सीजन ग्रुप

Web Title: seeds owing with mud cow dug fertilizer