बीडमध्ये 22 किलो चांदी जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

बीड - पोलिस अधीक्षक गोविंदराजन श्रीधर यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यास सुरवात केली आहे. रविवारी (ता.5) रात्री 11 ते सोमवारी (ता.6) पहाटे 5 वाजेपर्यंत ऑलआऊट ऑपरेशन राबवीत पाच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. वाहन तपासणीदरम्यान चऱ्हाटा फाट्याजवळ एका वाहनात 22 किलो चांदी आढळून आली. 

वाहनातील व्यक्तीकडे या चांदीची कागदपत्रे नसल्याने ती चांदी जप्त करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत 20 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन यातील 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

बीडमध्ये रविवारी रात्री 11 ते सोमवारी पहाटे 5 या वेळेत पोलिसांनी मोहीम राबवीत महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची झाडाझडती घेतली. पाच पोलिस निरीक्षक, 99 पोलिस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकातील 21 जवान, बीट मार्शलचे 18 अधिकारी आदींनी बीड शहरात पाच ठिकाणी नाकाबंदी करत तपासणी मोहीम राबवली. ग्रामीण हद्दीतही दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यादरम्यान चऱ्हाटा फाट्याजवळ एका कारची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 22 किलो चांदी आढळून आली.

पोलिसांनी तत्काळ निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांच्याशी संपर्क साधून कारवाईची माहिती दिली. चांदीसंबंधी कोणत्याही पावत्या नसल्याने ही चांदी जप्त करण्याचे आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनासह चांदी जप्त केली. सोमवारी दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती. याप्रकरणी ताब्यात घेतलेली व्यक्‍ती सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील व्यापारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
ऑलआऊट ऑपरेशनदरम्यान रात्री 12.30 नंतर तीन ठिकाणी फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यादरम्यान 17 लॉजिंग इमारतींची तपासणी केली असता, त्यापैकी तीन हॉटेल सुरू असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बीडमधील माळीवेस भागात एका ठिकाणी क्‍लबवर छापा टाकून त्या ठिकाणाहून 7 जणांना अटक करण्यात आली. यावेळी रोख रक्कम, दारू जप्त करण्यात आली. 

बीड तालुक्‍यातील चऱ्हाटा येथे एका वाहनात 22 किलो चांदी आढळून आली. वाहनातील व्यक्तींकडे चांदीच्या पावत्या नव्हत्या. त्यामुळे ही चांदी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांनी पुरावे आणून दिल्यास ती परत केली जाईल. 
- विकास माने, निवडणूक निर्णय अधिकारी, बीड. 

Web Title: Seized 22 kg of silver in Beed