सहस्रकुंड धबधब्याजवळ सेल्फीला बंदी

Selfie detained near Saharsrakund WaterFalls
Selfie detained near Saharsrakund WaterFalls

नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. याठिकाणी काही अनुचित किंवा दुर्घटना घडू नये याची काळजी व खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या धबधब्याजवळ सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे.

राज्यातील विविध पर्यटनस्थळी पावसाळा सुरू होताच खळखळत्या व धबधब्यासारख्या ठिकाणचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परंतु सेल्फीच्या नावाखाली अनेक दुर्घटना होत आहेत. त्या टाळण्यासाठी काही ठिकाणी सेल्फी घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

जिल्ह्यात सहस्त्रकुंड हा मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर पैनगंगा नदीवर असलेल्या धबधब्याचे आकर्षण भरपूर आहे. हा धबधबा सध्या खळखळून वाहत आहे. निसर्गरम्य स्थळ व परिसर पहाण्यासाठी जिल्ह्यातून लहान बालक, महाविद्यालयीन तरूण, जेष्ठ नागरिकांसह महिला व मुलींची संख्या वाढत आहे.

मागील आठवड्यात सेल्फीच्या नादी तीन तरूण या धबधब्यात पडले होते. परंतु जीवरक्षकांच्या व आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी त्यांचा प्राण वाचविला. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून पोलिस अधिक्षकांनी या भागात सेल्फीवर बंदी घातली आहे. तसेच पर्यटकांनी पाऊस चालु असतांना पाण्यात किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरु नये, या धबधब्यात मोठे व खोल कुंड असल्याने पर्यटकांनी आत उतरु नये, लहान मुले व वयोवृध्द व्यक्तींना धबधब्याजवळ घेऊन जाऊ नये.

हा धबधबा पाहण्यासाठी सोबत माहितगार (गाईड्स) व्यक्ती घेऊन जाऊन पुरेपुर माहिती घ्यावी. धबधबा पाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचा वापर करावा आणि महुसल, पोलिस तसेच पर्यटन विभागाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करत पर्यटकांनी काळजी व खबरदारी घ्यावी असे आवाहनही मीना यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com