सेल्फी (ना) ले ले रे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

जिल्ह्यात अठराशे शिक्षकांनीच काढला सेल्फी

लातूर - विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो सरल प्रणालीवर अपलोड करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. ९) सुरू झाली. पण पहिल्याच दिवशी या उपक्रमाला जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्वच शिक्षक संघटनांनी या उपक्रमाला विरोध केलेला आहे. तरीदेखील जिल्ह्यात तेरा हजार ६०० पैकी एक हजार आठशे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो अपलोड केला आहे. 

शाळांमधून विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, विद्यार्थ्यांना फोटो काढल्याचा आनंद व्हावा, या करिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम सुरू करताना शासनाने ग्रामीण भागातील परिस्थिती, किती शिक्षकांकडे अँड्रॉईड मोबाईल फोन आहेत, जुन्या शिक्षकांची मानसिकता आहे का?, ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा आहे का? याचा विचार न करता निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षकांच्या सर्वच संघटनांचा या उपक्रमास विरोध आहे. 

सोमवारी या उपक्रमाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात सर्व शाळांचे एकूण शिक्षक १३ हजार ६०८ आहेत. त्या पैकी केवळ एक हजार ८०३ शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो अपलोड केला आहे. यावरून शिक्षकांचा विरोध दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी सेल्फीचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना आनंद वाटावा, त्यातून तो शाळेत यावा हा त्यामागचा उद्देश आहे. पहिल्या दिवशी कमी  प्रतिसाद मिळाला असला तरी येत्या काही दिवसांत चांगला प्रतिसाद मिळेल.
- डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी.

विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचा घातलेला दंडक हा शिक्षकावर अविश्वास दाखविल्याचाच प्रकार आहे. शिक्षकांना मूळ उद्देशापासून दूर नेले जात आहे. अँड्रॉराईड मोबाईल घेण्याची सक्ती करणेही चुकीचे आहे. एकीकडे शिक्षकांनी वर्गात मोबाईल वापरू नये, असे आदेश दिले जातात तर दुसरीकडे  सेल्फी काढण्यास सांगितले जाते. त्यामुळे हा आदेश रद्द करण्याची गरज आहे.
- सुनील हाके, शिक्षक.

Web Title: selfie by teacher