
शिक्षण नेमकं कशासाठी? हे जाणून घेणं जसं महत्त्वाचं आहे. तसंच हे शिक्षण ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्या मुलांना जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. शिक्षकांसमोर रसरशीत व्यक्तिमत्वाची नवी पिढी असते. त्यांचे तरल चेहरे उत्सुकतेने आणि उत्साहाने बघणारे डोळे शिक्षकांना सतत आव्हान करत असतात.
सेलू (परभणी) : शाळेपासून दूर पळणार्या मुलांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या व पुस्तकांच्या माध्यमातून अंधारापेक्षा प्रकाशाची एक तिरीप मिळते. तेंव्हा त्या मुलांना मोलाची वाटू लागते, असे मत 'आनंदाच झाड' जोपासणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पार्डी येथील शिक्षक युवराज माने यांनी मंगळवारी (ता.२९) रोजी व्यक्त केलं आहे.
शिक्षण नेमकं कशासाठी? हे जाणून घेणं जसं महत्त्वाचं आहे. तसंच हे शिक्षण ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्या मुलांना जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. शिक्षकांसमोर रसरशीत व्यक्तिमत्वाची नवी पिढी असते. त्यांचे तरल चेहरे उत्सुकतेने आणि उत्साहाने बघणारे डोळे शिक्षकांना सतत आव्हान करत असतात. ते उजळले की त्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघण्याचं भाग्यही शिक्षकांच्या नशिबात असत. आज वातावरण असं आहे की, जे फक्त धावणं नि धावणंचं शिकवतं. नुसतं धावत राहा, धावत राहा एवढं सांगत राहणं म्हणजे शिक्षकपण होय का? म्हणून विद्यार्थ्यांची धावण्याची दिशा तरी निश्चित करून दिली पाहिजे.
हे ही वाचा : हिंगोलीत राज्य राखीव पोलिस दलातील जवानाची आत्महत्या
आपल्या पुढील पिढीच्या आनंदाची पूर्वतयारी फक्त त्यांना आर्थिक चिंतेतून मुक्त करण्यातून न करता त्यांच जगणं समग्रतेने त्यांनी जगावं यासाठी त्यांना सबळ-सक्षम करायला हव. आयुष्यात स्वतःला कुठे जायचंय काय व्हायचंय? याचा निर्णय थोड्या धिराने घ्यायला हवा. झाडाप्रमाणेच नव्या पिढीची वाढही 'नैसर्गिक' च हवी. शेतकरी ज्याप्रमाणे शेतीत पेरणी केल्यापासून ते पिक निघेपर्यंत शेतीचे संरक्षण करत असतो. पिक काढणीला आल्यानंतर त्याला अत्यंत सतर्क राहावं लागतं. अशी भूमिका शिक्षक म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रातही असायला हवी. शिक्षक या पदाची व्याप्ती आणि खोली जाणनारे शिक्षक असणं खूप गरजेचं आहे.
हे ही वाचा : हिंगोलीत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज
नव्या पिढीच्या जाणिवा विकसित करतो तो शिक्षक. पहिलीत आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश करतांना पालक शिक्षकांवर किती मोठा विश्वास टाकतात. तो विश्वास सार्थकी लावणं हे शिक्षकांच कर्तव्य आहे. शिक्षक शिक्षणाचं महत्व जाणून असतो. पालकांपेक्षा तो जागृत असतो. पालक मुलांना शाळेत पाठवल्यानंतर गुरुजीच त्या मुलांचा भाग्यविधाता असतो. शाळेत आल्यानंतर प्रत्येक मूल शिक्षकच असत. मुलांविषयी चांगल-वाईट याची जाणीव त्याला असायलाच हवी. घरात, वर्गात मुलांच्या रूपांत शिक्षकाला भविष्यातील सुंदर शक्यता दिसायलाच हव्यात. ज्यात उद्याची कवी, संगीतकार, संशोधक, डॉक्टर वा उद्याचे ज्ञानपीठ स्विकारणारे हात वर्गात असू शकतात.
शिक्षण म्हणजे केवळ काही वर्षांपूर्वी संकलित केलेल्या माहितीचे गाठोड मुलांच्या डोक्यावर फेकणे नव्हे. तर त्याचं वर्तमानाशी नातं जोडता यायला हवं. तेच खरं शिक्षण त्यात भर पडतच राहते. भिंतीपलीकडच्या जगातलं शिक्षकांच अध्यापन जेंव्हा चटकन भिंतीपलीकडे जातं तेंव्हा ती 'शाळा' न राहता ते गुरुकुल होत. तिथंच शिक्षकांचा 'गुरु' होतो.
- युवराज माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी, सेलू, परभणी.