अतिरिक्त आयुक्तांच्या मारहाणीचा शासनाला पाठविणार अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

औरंगाबाद : अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना झालेल्या मारहाणीचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. 22) घडलेल्या घटनेनंतर भालसिंग सुटीवर असून, ते परत आल्यानंतर हा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

उघड्या नाल्यांमध्ये पडून गेल्या आठवड्यात अवघ्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला होता. जयभवानीनगर येथे बुधवारी (ता. 20) भगवान मोरे तर गुरुवारी (ता. 21) सिडको एन-6 भागात चेतन चोपडे या तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. या वेळी रवी गायकवाड या तरुणाने भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकवली. या घटनेचा निषेध महापालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केला होता. दरम्यान घटनेचा अहवाल शासनाला पाठविण्याचा निर्णय आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घेतला आहे. भालसिंग सुटीवरून परतल्यानंतर हा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: send report to government of beating a additional commissioner