तरुण शेतकऱ्याची हिंगोलीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सेनगाव (हिंगोली) - कोळसा (जि. हिंगोली) येथील तीसवर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने खासगी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतातील झाडाला गळफास घेऊन बुधवारी (ता.14) आत्महत्या केली. संतोष मारोतराव बेंगाळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी गावातील खासगी सावकाराकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, पेरणीच्या तोंडावर कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.
Web Title: sengav marathwada news youth farmer suicide