अपघातात गंभीर भाजलेला तरुण दवाखान्यात दाखल, समाजभान टीम मदतीसाठी आली पुढे

बाबासाहेब गोंटे
Wednesday, 7 October 2020

अपघातात गंभीररित्या भाजलेला बाळू तिकांडे या तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आली आहे.

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील शेवगा येथील बाळु नानाभाऊ तिकांडे हा रोजगाराच्या शोधात सतत भटकंती करत होता. अखेर त्याने महावितरणात कंत्राटी काम स्वीकारले. त्यातुन त्याला आतासाठी हातभार लागला. रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. तो कर्जत (ता.अंबड) येथील वीज उपकेंद्रात काम करत होता. काम करत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्याचे प्राण वाचवायाचे असेल तर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगताना पंधरा ते सोळा लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले.

कुंटुंबाची परिस्थिती हलाखीची
बाळु तिकांडे हा शेतकरी कुटुंबातील असून त्याची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील शेती व्यवसाय करतात. सध्या शेती व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मुलगा बाळु यांच्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या लाखो रुपये खर्च पेलावत नाही. यामुळे संपूर्ण कुटुंब पुरते हतबल होऊन बसले आहे.

जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुल्काविरोधात पालक आक्रमक, शाळेच्या मुख्याध्यापकांना घातला घेराव

समाजभान टीमचा उपचारासाठी पुढाकार
समाजभान टीमला बाळु तिकांचे याचा झालेला अपघात व त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च त्याच्या घरच्या आर्थिक बेताच्या परिस्थितीमुळे परवडणारा नाही. हे लक्षात येताच समाजभान टीमचे सदस्य यांनी अवघ्या पाच दिवसांत आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी खारीचा वाटा उचलत ८६ रुपयांचा धनादेश देत आपले सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारले आहे. उपचारादरम्यान बाळुचा एक हात या फॅक्चर झाल्याने काढण्यात आलेला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये येणार असल्याने समाजातील दानशुर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेऊन मदतीसाठी खरीचा वाटा उचलला तर बाळु तिकांडे या गरीब कुटुंबातील तरुणांचे प्राण वाचू शकते.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serious Burned Youth Admitted In Hospital Jalna News