महिनाभर सर्वर डाऊन असल्याने शेतकऱ्यांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

जरंडी : महिनाभरापासून डाऊन झालेल्या सर्वरने मंगळवारी केवळ दहाच मिनिटे दर्शन दिल्याने या दहा मिनिटाच्या कालावधीत केवळ एकाच शेतकऱ्याचा सातबारा मिळाला. परंतु तोही अपूर्ण स्थितीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने मिळालेला सातबारा तहसीलाच सोडून निघून गेला. दरम्यान सर्वर सुरु होताच शेतकऱ्यांची सातबारा काढण्यासाठी तहसील कार्यालयावर मोठी झुंबड उडाली होती. केवळ सर्वरच्या दहा मिनिटाच्या दर्शनाने महिनाभरापासून सातबाऱ्यासाठी व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा माघारी फिरावे लागले.

महिनाभरापासून सोयगाव तालुक्यात सातबाऱ्यांचे सर्वर डाऊन आहे. शेतकऱ्यांना शेतीचे उतारे मिळत नसल्याने सोयगाव तालुक्यात मोठा गोंधळ पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना सर्वरच्या प्रतीक्षेसाठी दररोज सोयगावला यावे लागत असल्याने शेतीचे कामे रखडली आहे. मंगळवारी अचानक दहा मिनिटे सर्वरने दर्शन दिल्याने तलाठ्याजवळ सातबारे काढण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाली असतांना अचानक दहा मिनिटातच सर्वर बंद झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला होता. दरम्यान सर्वरचे दुरुस्तीचे पहिल्या टप्प्यातील पुण्याचे काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद विभागाच्या दुरुस्तीचे काम प्रगती पथावर असल्याचे संकेत महसूल विभागाने दिले आहेत. मराठवाड्यात बुधवार पासून केवळ सोयगावलाच शेती उतारे मिळणार असल्याचेही संकेत महसूल विभागाने दिल्याने मंगळवारची रात्र शेतकऱ्यांनी सोयगावलाच मुक्काम ठोकला आहे. दरम्यान शेतीचे पिककर्ज, नवीन हंगामातील हवामान आधारित खरीपाचा पीकविमा, आदी शेतकऱ्यांचे कामे सर्वर बंद अभावी रखडले आहे. महिनाभरापासून सातबार काढण्यासाठी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. नव्याने शेतीची खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही स्वतःच्या मालकीच्या नावाचा सातबारा पहावयास मिळालेला नाही.

सर्वरचे दुरुस्तीचे काम प्रगती पथावर असल्याने औरंगाबाद विभागाचे दुरुस्तीचे काम रात्रभरातून पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बुधवार पासून ओनलाईन शेतीचे उतारे डिजिटल पद्धतीत मिळतील असे वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे.

- छाया पवार तहसीलदार सोयगाव

Web Title: Since the server is down for a month