औरंगाबादमध्ये सेवा क्षेत्रात प्रचंड वाव - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद - 'औरंगाबादेत सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड वाव आहे. यामुळे आगामी काळात होम सर्व्हिससह निरनिराळ्या सेवा, ऍडव्हान्स रोबोटिक्‍स हे काम येथे मोठ्या प्रमाणावर होणार आहे,'' असे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी (ता. 22) पत्रकार परिषदेत सांगितले.

'आगामी काळात उद्योग, व्यापार, वाणिज्य या तीनही गोष्टींत मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे. उद्योगांच्या पायाभूत सुविधेसाठी नवीन नीती तयार केली आहे. त्या आधारे उद्योगाला लागणारे इन्फ्रास्ट्रक्‍चर्स तयार करून देण्याची जबाबदारी सरकारची किंवा खासगी संस्थांची राहणार आहे. उद्योगांनी आपला वेळ आपल्या उत्पन्नाकडे द्यावा. सेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी बारा चॅम्पियन्स सेक्‍टर शोधले जाणार आहेत. याशिवाय शेती उत्पन्न वाढावे, यासाठी कृषी निर्यात नीती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अरब देश गुंतवणूक करण्यास तयार आहेत,'' अशी माहितीही प्रभू यांनी दिली.

Web Title: service field scope suresh prabhu