कोरोना झाल्याचे सांगून मारहाण, परस्परविरोधी गुन्हे...बीड जिल्ह्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

धारूर तालुक्यातील देवठाणा  गावात येथे परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिरसाळा पोलिस ठाण्यात एका गटाने तुला कोरोना झाल्याचे सांगून मारहाण झाल्याची तक्रार दिली, तर दुसऱ्या गटाने संचारबंदी तोडून आम्हाला मारहाण केल्याचे म्हटले आहे. 

सिरसाळा (जि. बीड) - तुझ्या घरच्यांना कोरोना झाला आहे, या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून एकाचे काठीने मारहाण करून डोके फोडल्याची घटना धारूर तालुक्यातील देवठाणा गावात घडली. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

देवठाणा गावातील ऋषिकेश बंडू वावळकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातील नारायण भगवान काशीद, पप्पू उर्फ जिजासाहेब भगवान काशीद, संतोष मोतीराम सोळंके यांनी संगनमताने घरात घुसून तुझ्या आजी-आजोबा, मामी, मावशीला कोरोना रोग झाला असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली व डोक्यात काठीने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेतील जिजासाहेब काशीद यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तपास उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले हे करत आहेत.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

या प्रकरणात पप्पू उर्फ जिजासाहेब काशीद यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, संचारबंदीचे आदेश असताना घराबाहेर पडून शेतातील झाडे का तोडता, असे विचारताच बाळासाहेब सहजराव, ऋषिकेश वावळकर, रंगनाथ सहजराव, ओम सहजराव (रा. देवठाणा, ता. धारूर) यांनी संगनमताने शिवीगाळ व काठीने मारहाण करून जखमी केले. त्यामुळे या प्रकरणात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार दिलीप कुरेवाड हे तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven accused in Sirasala police station

Tags
टॉपिकस
Topic Tags: