परदेशातून आलेल्या व्यक्तीला कोरोना लागण, लातूर जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह

Latur Corona Updates, Latur
Latur Corona Updates, Latur

लातूर : लातुरात कतार देशामधून आलेल्या सहापैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. यासह लातूर जिल्ह्यातील सात जणांचा अहवाल गुरुवारी (ता.१८) पॉझिटिव्ह आला. दरम्यान, उदगीरमध्ये बुधवारी (ता.१७) मृत्यू झालेल्या एका ज्येष्ठ महिलेचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या ११ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी कतारमधून सहा नागरिक लातूरमध्ये आले होते. ते मूळचे कासार बालकुंदा (ता.निलंगा) येथील आहेत.

त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या तपासणीनंतर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेली महिला या मूळच्या जळकोट तालुक्यातील एकूर्गा येथील आहेत. सारी आजारामुळे त्यांना उदगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारदम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. या अहवालात त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातील १२७ व्यक्तीचे स्वब तपासणीसाठी आले होते. त्यातील तब्बल ११२ अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यात सात पॉझिटिव्ह आणि ८ जणांचा अहवाल अंतिम आला नाही. सात पॉझिटिव्ह पैकी चार रुग्ण हे आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत तर तीन रुग्ण नवे कोरोनाबाधित आहेत.


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती भोई गल्ली (लातूर) येथील असून एक व्यक्ती सुतमिल रस्ता (लातूर) येथील आहे. महापालिकेकडून तापसणीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती व्यक्ती जुनी कापड लाईन (लातूर) येथील आहे. याशिवाय, एक व्यक्ती माळकोंडजी (ता. औसा) येथील, एक व्यक्ती उदगीरमधील तर उर्वरित एक व्यक्ती परदेशातून लातुरात आलेली आहे, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

दोघांची कोरोनावर मात
रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील एकाच कुटुंबातील ५० व ४० वर्ष वयाच्या दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता व दोघेही १२ दिवस अतिदक्षता विभागात होते. त्या दोन्ही रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांची आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे, कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, औषधवैद्यकशास्त्र डॉ.निलिमा देशपांडे यांनी दिली.

लातूर: कोरोना मिटर
एकूण रुग्ण : २१७
बरे झालेले रुग्ण : १३९
उपचार सुरु असलेले : ६७
मृत्यू : ११

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com