हिंगोलीजवळ भीषण अपघातात सात ठार

accident
accident

हिंगोली : हिंगोली ते वाशिम मार्गावर कलगाव पाटीजवळ भरधाव ट्रकने जीपला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सात जण ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 20) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातातील सर्व सात जण वाशिम जिल्ह्यातील आडगांव येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम येथून एक जीप मध्यरात्रीच्या सुमारास हिंगोली कडे येत होती. ही जीप हिंगोली शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आली असतांना हिंगोली कडून वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकने जीपला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये जीपमधील सात जण ठार झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक डॉ. सिध्देश्वर भोरे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती थोरात, उपनिरीक्षक किशोर पोटे, शेख जावेद, रमेश ठाकूर, किशोर कातकडे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

अपघातामध्ये जीपचा चुराडा झाला आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की यामध्ये ट्रकच्या समोरील चाकांचे रॉड तुटून गेले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी दरवाजे तोडून सहा मयतांना बाहेर काढले. या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या दोघांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यात रुग्णालयात दाखल दोन पैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मयत झालेले सात जण 30 ते 35 वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मयत हे वाशिम जिल्ह्यातील आडगाव येथील असल्याचीही पोलिसांनी स्पष्ट केले. या अपघातानंतर हिंगोली ते वाशिम मार्गावरील वाहतूक रात्री दोन वाजल्यापासून ठप्प झाली होती. पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती. त्यामुळे वाहनांच्या हिंगोली वाशिमकडे मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक करण्याचे काम सुरू होते. अपघातामधील झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com