Breaking : जालना हादरले, एकाच दिवशी सात पॉझिटीव्ह, मंठ्यातही कोरोना

महेश गायकवाड
Saturday, 16 May 2020

शुक्रवारी एकाच दिवशी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.

जालना : जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित सात रुग्णांवर उपचार करण्यात यश मिळाल्यामुळे जालन्याला गुरुवारी (ता. 14 ) दिलासा मिळाला. मात्र, शुक्रवारी (ता. 15) रात्री सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्याची अॅक्टिव रुग्ण संख्या गुरुवारी  अठरा वरून अकरावर आली होती. मात्र, शुक्रवारी एकाच दिवशी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. नव्याने बाधित रुग्णांमध्ये राज्य राखीव दलातील चार जवान, एका खासगी रुग्णालयातील  डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी व मंठा तालुक्यात मुंबईहून परतलेल्या एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुधकर राठोड यांनी दिली आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 18 होती. त्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात 11 रुग्ण राहिले होते.

IVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
 
यांना झाली बाधा
शुक्रवारी रात्री मालेगाव बंदोबस्‍तावरून परतलेल्या जवानांसह अन्य संशयित अशा 80 व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात राज्य राखीव दलातील चार जवानांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. तसेच मंठा तालुक्यातील पेवा येथे एक २५ वर्षीय महिला मुंबईहून परतली होती.

तिचे गावातच अलगीकरण करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 25 रुग्ण आढळून आले असून, त्यातीदल सात रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या 18 झाली आहे. 

ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven more People test Positive for COVID-19 in Jalna