सत्तर हजार क्विंटल बियाण्यांची गरज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

बीड - जिल्ह्यात यंदा खरिपाची पेरणी सहा लाख ६४ हजार हेक्‍टरवर अपेक्षित असून यासाठी साधारण ७० हजार क्विंटल बियाणे, तर दोन लाख ४४ हजार ८३४ क्विंटल खताची गरज आहे. नगदी पीक समजले जाणाऱ्या सोयाबीनचे ५४ हजार, तर कपाशीचे ६,२९१ क्विंटल बियाणांसह अडीच लाख क्विंटल खताची मागणी कृषी विभागाने बियाणे व खतउत्पादक कंपन्यांकडे केली आहे. जिल्ह्यात यंदा मागच्या वर्षीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतकरी उन्हाळी मशागतीत गुंग झालेला दिसत आहे. जिल्ह्यात यंदा सहा लाख ६४ हजार हेक्‍टरवर पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान, मागच्या काही वर्षांपासून जिल्ह्यात नगदी पिकांकडे कल वळला असल्याने बाजरीची पेरणी कमी होत आहे. त्या तुलनेत सोयाबीन आणि कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. 

तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ७० हजार क्विंटल बियाणांची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ऐनवेळी कमतरता भासू नये यासाठी कंपन्यांकडे आतापासूनच बियाणांची मागणी नोंदविली जात आहे.

खतांची मागणी 
युरिया     -     ८६,३८५
डीएपी     -     ३१,४४७
एसएसपी     -     ५,५५८
एमओपी     -     २८,६९४
संयुक्तखते     -     ९२,७६०
एकूण     -     २,४४,८३४

Web Title: Seventy thousand quintals of seeds needed