बीडमध्ये पुन्हा सेक्‍स रॅकेट उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

बीड - महिलांकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेणाऱ्या अंकलला बुधवारी (ता. ३०) रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बेड्या ठोकल्या. शहरातील जयदुर्गा कॉलनीत ही कारवाई करण्यात आली आहे.

बीड - महिलांकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेणाऱ्या अंकलला बुधवारी (ता. ३०) रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बेड्या ठोकल्या. शहरातील जयदुर्गा कॉलनीत ही कारवाई करण्यात आली आहे.

रामा वासुदेव लकडे (वय २३, रा. धनगरवाडी, ता. बीड) असे अंकलचे नाव आहे. तो जयदुर्गा कॉलनीत किरायाच्या घरात कुंटणखाना चालवित असल्याची माहिती मिळाल्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख फौजदार भारत माने यांनी शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्यासमवेत सापळा रचला. यावेळी डमी ग्राहक पाठवून छापा मारण्यात आला. यामध्ये रामा लकडे याला अटक करण्यात आली असून, यावेळी पोलिसांनी बीडमधीलच एका २१ वर्षीय महिलेची अंकलच्या ताब्यातून सुटका केली.

फौजदार दीपाली गित्ते, ए. एम. सान, सिंधू उगले, नीलावती खटाणे, मीना घोडके, सतीश बहिरवाळ, शेख शमीम पाशा, विकास नेवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: sex racket in beed crime