हॉटेलवरील सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

बीड - शहरातील नगर रोडवरील एका हॉटेलामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा पोलिसांनी बुधवारी (ता. 18) सायंकाळी पर्दाफाश केला. यावेळी एका पीडितेची सुटका करण्यात आली असून हॉटेलमालकासह ग्राहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंटी व अन्य एका हॉटेलमालकाने पळ काढला. 

बीड - शहरातील नगर रोडवरील एका हॉटेलामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा पोलिसांनी बुधवारी (ता. 18) सायंकाळी पर्दाफाश केला. यावेळी एका पीडितेची सुटका करण्यात आली असून हॉटेलमालकासह ग्राहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंटी व अन्य एका हॉटेलमालकाने पळ काढला. 

याबाबत माहिती अशी, की शहरातील नगर रोडवरील चऱ्हाटा फाट्यावरील हॉटेल स्वराज हे नागेश मिठे व अमोल देवळकर यांनी भागीदारीत चालविण्यासाठी घेतले आहे. तेथे रेश्‍मा (पूर्ण नाव नाही) नावाची आंटी मुली, महिलांना पाठवून त्यांच्याकडून वेश्‍या व्यवसाय करून घेत असे. त्यातील निम्मे पैसे हॉटेलचालकास मिळत, तर निम्मे आंटी घेत असे. याची माहिती बुधवारी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दीपाली गिते, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे, सहायक फौजदार शिवाजी भारती, हेडकॉन्स्टेबल नीलावती खटाणे, सुरेखा उगले, मीना घोडके, शमीम पाशा, विकास नेवडे यांनी सापळा लावून हॉटेलमध्ये डमी ग्राहक पाठविला. त्याने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खोली क्रमांक 104 मध्ये एका महिलेसोबत ग्राहक गजानन सजगणे (रा. जिरेवाडी, ता. बीड) यास पकडण्यात आले. पोलिसांनी हॉटेलमालक नागेश मिठे यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू 
रेश्‍मा ही आंटी फोनवर ग्राहकांशी व्यवहार ठरवायची. त्यानंतर हॉटेलमध्ये मुली, महिला पाठवून त्यांच्याकडून वेश्‍या व्यवसाय करून घेत असे, अशी माहिती समोर आली आहे. फरार आंटी रेश्‍मासह अन्य एक हॉटेलमालक अमोल देवळकर यांचा शोध सुरू असल्याची माहिती निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दिली.

Web Title: Sex racket in hotel beed news