औरंगाबादच्या पोलिस उपायुक्तांवर लैंगिक शोषणाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद : एका महिला पोलिसांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली औरंगाबाद शहर पोलिस दलातील परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात ही नोंद झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महिला पोलिसांच्या बावीस वर्षीय मुलीला एमपीएसी परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा श्रीरामे यांच्यावर आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे. पीडिते तरुणीने पोलिस विभागाच्या वॉटस्अॅपवरून तक्रार नोंदवली.

Web Title: Sexual assault on Aurangabad police Deputy Commissioner