मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनींशी अश्‍लील संवाद

जरंडी (ता. सोयगाव) - शाळेत जमलेला पालकांचा संतप्त जमाव.
जरंडी (ता. सोयगाव) - शाळेत जमलेला पालकांचा संतप्त जमाव.

सोयगाव - जरंडी (ता. सोयगाव) येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील तीन वर्गांतील तब्बल २१ विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापकानेच अश्‍लील भाषेतील संकेतांक वापरून त्यांना आठवडाभरापासून मानसिक त्रास दिला. हा प्रकार मंगळवारी (ता. पाच) उघडकीस आला. या प्रकरणी विद्यार्थिनींच्या सांगण्यावरून पालकांच्या वतीने तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.  जरंडी येथील शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. सहावी ते आठवी या तीन वर्गांतील तब्बल २१ विद्यार्थिनींनी शाळेचा मुख्याध्यापक अश्‍लील भाषा वापरत असल्याची तक्रार पालकांकडे केली. त्यावरून पालकांनी मंगळवारी सकाळी शाळा गाठली. हा प्रकार खरा असल्याचे पुन्हा विद्यार्थिनींनी सांगितल्यावरून पालकांच्या वतीने विष्णू वाघ, गोविंद राठोड यांनी सोयगाव पोलिसांत फिर्याद दिली. गटविकास अधिकारी एम. सी. राठोड, गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांनी तातडीने शाळेला भेट देऊन २१ विद्यार्थिनींचा जबाब घेतला.

संबंधित शाळेला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये तीनही वर्गांतील विद्यार्थिनींचे जबाब नोंदविण्यात आले. संबंधित मुख्याध्यापकास तातडीने निलंबित करण्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. 
- एम. सी. राठोड, गटविकास अधिकारी, सोयगाव. 

जरंडी शाळेची तक्रार प्राप्त झाली आहे. यावर चौकशी करण्यासाठी महिला पोलिस नियुक्त करण्यात आले असून, चौकशीत तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.
- शेख शकील, पोलिस निरीक्षक, सोयगाव

जरंडी येथील शाळेला भेट देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आली असून, संयुक्त अहवाल कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे.
- विजय दुतोंडे, गटशिक्षणाधिकारी सोयगाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com