जालन्यात तरुणाचा निर्घृण खून

जालना - मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला ते ठिकाण.
जालना - मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला ते ठिकाण.

शहागड/गोंदी - शहागड-गोंदी रोडवरील कुरण फाट्याजवळ रविवारी (ता. ७) मध्यरात्री दोनच्या सुमारास आनंत श्रीकांत इंगोले (वय २८, रा. समनापूर, ता. जि. बीड) या तरुणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा खून पैशांच्या व्यवहारातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नातेवाइकांच्या फिर्यादीवरून तीन  संशयितांविरोधात गोंदी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड तालुक्‍यातील शहागड-गोंदी रस्त्यावर कुरण फाट्याजवळ एक मृतदेह जळत असल्याची माहिती गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विकास कोकाटे यांना रविवारी मध्यरात्री फोनव्दारे कळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. चंद्रकांत शिंदे यांच्या शेतालगतच्या रोडवर एक जळालेल्या अवस्थेतेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला.

रॉकेल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी आर. व्ही. सोनुने यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर रात्री दोन वाजल्यापासून पोलिसांचा पहारा होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी शहागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. मृताचे चुलते भास्कर किसनराव इंगोले (रा. समनापुर ता. जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिसांत तीन अज्ञांतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विकास कोकाटे हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली.

अशी पटली ओळख
मृतदेहाच्या बाजूला एक बॅग जळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ही बॅग विझविली. बॅगेतील कागदपत्रांवरुन मृतदेहाची ओळख पटली. मृत आनंत श्रीकांत इंगोले हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून तो औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस करीत होता.

मेसेजमध्ये काय म्हणाला आनंत
रात्री पाचोडज वळील एका ढाब्यावर जेवण करताना आनंत याने मोठा भाऊ गोविंद इंगोले यांना तीन मेसेज केले. ‘मी धुमाळ सोबत आहे. माझे २१ लाख रुपये ट्रकच्या पार्टनरशिप मधून येणार आहेत. जेवण झाल्यानंतर त्यांनी मला दारू पाजली आहे. त्यांची लक्षणं बरोबर वाटत नाहीत व माझा घातपात होण्याची शक्‍यता आहे. यांची नियत काही ठीक नाही’ अशा आशयाचे तीन मेसेज त्याने केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com