सरकारचा धिक्कार असो; 'अंनिस'कडून घोषणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास अद्याप लागला नाही. त्यामुळे समितीच्या लातूर शाखेने बुधवारी (ता. 20) 'निर्भय मॉर्निंग वॉक' काढला. या वेळी सरकारचा धिक्कार असो, जातीयवाद्यांचा धिक्कार असो, धर्मवेड्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज सकाळी सहा वाजता 'निर्भय मॉर्निंग वॉक' काढण्यात आला. यात राज्य प्रधान सचिव माधव बावगे, वैजनाथ कोरे, प्रा. एम. बी. पठाण, रुक्साना मुल्ला, संदीपान बडगिरे, अनिरुद्ध जाधव, अनिल दरेकर, प्रा. शाम आगळे आदी उपस्थित होते. बावगे म्हणाले, "डॉ. दाभोलकर यांच्या सारख्या माणसांनी समाजाला शहाणं करण्याचं काम केलं; हाच त्यांचा गुन्हा ठरला. पण त्यांचा विचार आपण पुढे घेऊन जाऊ. भ्याड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचा खून केला आहे. त्या मारेकऱ्यांचा शोध लागलाच पाहिजे."

Web Title: shame on government said by andhashraddha nirmulan samiti in nirbhaya walk latur