अपयशींच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

राज्यात शेतकरी आत्महत्या व बेरोजगारी वाढत आहे. सरकारची धोरणेच यासाठी कारणीभूत आहेत. यामुळे तरुण पिढी व शेतकरी नैराश्येत आहेत. अशा, अपयशींच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका...

बीड : राज्यात शेतकरी आत्महत्या व बेरोजगारी वाढत आहे. सरकारची धोरणेच यासाठी कारणीभूत आहेत. यामुळे तरुण पिढी व शेतकरी नैराश्येत आहेत. अशा, अपयशींच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. एकिकडे संपत्तीचा डोंगर तर दुसरीकडे कष्टकऱ्यांचा दर्या (समुद्र) असल्याचेही शरद पवार म्हणाले. 

शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात परिवर्तनात साथ देणारा बीड जिल्हा आहे. एकदा जिल्ह्यातील सर्व आमदार विजयी झाले होते. परिवर्तनात साथ देणारा बीड जिल्हा आहे. सरकारच्या धोरणांमुळे राज्यात बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात पाच वर्षांच्या कामावर मत मागत आहोत. परंतु, पाच वर्षांचा काळ अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र आता नव्या पिढीच्या हाती द्यायचा आहे. निवडणुकीत तरुणांना संधी द्यायची आहे. निम्म्याहून अधिक तरुण रिंगणात असतील असेही शरद पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar attack bjp government at beed