शरद पवार आपले दैवत: आमदार वडकुते

मंगेश शेवाळकर
रविवार, 24 जून 2018

राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपले दैवत असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचा कुठल्याही प्रकारचा विचार  मनात येत नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी सांगितले.

हिंगोली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपले दैवत असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचा कुठल्याही प्रकारचा विचार  मनात येत नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी सांगितले.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटिल रविवारी (ता.24) परभणी येथे आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली यावेळी त्यांनी चहा पाणी घेतले तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. वडकुते यांचे सभागृहातील काम चांगले असून ते नेहमीच जनहिताचे प्रश्न मांडतात त्यामुळे त्यांचे काम आवडत असल्याचे महसूल मंत्री श्री पाटील यांनी श्री. वडकुते कुटुंबियांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळेच आपण आवर्जून चहा पाण्यासाठी आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटिल व राष्ट्रवादीचे आमदार श्री. वडकुते यांच्यातील आज सकाळी सुमारे वीस मिनिट झालेल्या भेटीनंतर अनेक राजकिय तर्कवितर्क काढले जाऊ लागले होते. या भेटीमध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकताही राजकीय क्षेत्राला लागली होती. यासंदर्भात आमदार वडकुते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता महसूल मंत्री श्री. पाटील यांच्याशी वैयक्तिक नाते असल्यामुळे ते चहापाण्यासाठी आले होते. यावेळी कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. तर घरी आलेल्या पाहूण्यांकडे विकासकामांसाठी निधीची मागणी करणे योग्य वाटले नाही. ही भेट केवळ कौंटूबिक आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपले दैवत असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे आपण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा असून त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही.  या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ लावू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यातही आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगत त्यांनी राजकीय अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Web Title: sharad pawar is our god says MLA vadkute