भारताची पाकिस्तानला भिती, मुस्लिमांना नाही : शहनवाझ हुसेन

हरी तुगावकर
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मुस्लिमांच्या दृष्टाने भारत हा जगात एकमेव सुरक्षीत देश आहे. त्यामुळे येथे मुस्लिमांनी भिती बाळगण्याचे काहीही कारण नाही. भारताची भिती सध्या पाकिस्तानला आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

लातूर : मुस्लिमांच्या दृष्टाने भारत हा जगात एकमेव सुरक्षीत देश आहे. त्यामुळे येथे मुस्लिमांनी भिती बाळगण्याचे काहीही कारण नाही. भारताची भिती सध्या पाकिस्तानला आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मॉब लिचिंग ही भारतीय संस्कृती नाही. त्यामुळे अशा गोष्टीला भाजपचा कधीच पाठिंबा राहिला नाही. मॉब लिचिंग करणाऱयावर कारवाई करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनीही देखील मॉल लिचिंगचा निषेधच केला आहे. भाजपच्या सरकारच्या काळात ही एकही जातीय दंगल झाला नाही किंवा संचारबंदी लागलेली नाही. काँग्रेसने मुस्लिमांना गरीबच ठेवले तर मोदींनी त्यांना आय़ुष्यमान भारत दिले. नेता इमानदार आहे त्यामुळे भितीचे काहीच कारण नाही. आपण येथे जन्मलो आपण भाग्यवान आहोत. भारताची भिती पाकिस्तानला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपले मुस्लिम येथे सुरक्षीत आहेत पण बांग्लादेशच्या नागरीकांना परत आपल्या देशात जावेच लागेल. जर भारतात यायचे असेल तर त्यांना विझा काढावा लागेल. या बाबत सरकार ठाम आहे. पण काँग्रेसला आपल्या मुस्लिमांपेक्षा बांग्लदेशाच्या नागरीकांची अधिक चिंता आहे, अशी टीका त्यांनी केली.

गैरव्यवहाराची संबंध नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली. ही कारवाई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे का? यावर श्री. हुसेन म्हणाने, ईडी, सीबीआय हा स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे नियंत्रण नाही. मी भाजपचा प्रवक्ता आहे. अशी का कारवाई केली त्याचे उत्तर ईडीचे प्रवक्तेच देवू शकतील. पण ही कारवाई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली नाही. भाजपच्या नेत्यानेही गडबड केली तर ईडीकडून कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shehnawaz husain speaks at rally in latur