Osmanabad : उमरग्यात पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shetkari Sanghatana Agitation In Umarga
Osmanabad : उमरग्यात पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

Osmanabad : उमरग्यात पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील कसगी, कसगीवाडी येथील शेतकरी संघटनेच्या वतीने पिकविमा रक्कमेच्या मागणीसाठी सोमवारी (ता.२०) लातूर-कलबुर्गी महामार्गावर कसगी गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलनामुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कसगी व कसगीवाडी येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतू या पिकांवर काढलेल्या पिकविम्याची (Crop Insurance) रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यातच शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर म्हणून महावितरण कंपनीने अतिरिक्त (Osmanabad) वीजबिलाचा बोजा घालण्याचा निर्णय घेतला आहे. हक्काच्या पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी (Umarga) विमा कंपनीला सक्ती करावी, अतिरिक्त वीजबिल मागे घेण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान संजय नंदर्गे, सोमनाथ चटपटणे, गोविंद महाराज पुरी, अॅड.शितल चव्हाण यांची भाषण झाले. (Shetkari Sanghatana Rasta Roko Agitation In Umarga Of Osmanabad District)

हेही वाचा: Parbhani : पालममध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह ७ जणांवर गुन्हा दाखल

या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ जगदाळे, रवी मनगुळे, मोहन भोसले, राजेंद्रसिंह राजपुत, मल्लीनाथ बोरूटे, मनोज मांडवे, अमरसिंह राजपूत, वामन माशाळे यांच्यासह कसगी व कसगीवाडी येथील शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. मंडळ अधिकारी दीपक चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनामुळे जवळपास दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक कवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा: Aurangabad : दीड वर्षानंतर औरंगाबादेतील प्राथमिक शाळा झाल्या सुरु

केवळ शंभर शेतकऱ्यांनाच विमा मंजूर !

कसगी, कसगीवाडीच्या हद्दीत जवळपास दीड हजारापेक्षा अधिक खातेदार शेतकरी आहेत. खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली. बेन्नीतुरा नदीकाठच्या जमिनीचे पिकासह नुकसान झाले होते. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता. मात्र शंभरपेक्षाही कमी शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. असे माजी सरपंच हणमंत गुरव यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Web Title: Shetkari Sanghatana Rasta Roko Agitation In Umarga Of Osmanabad District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top