स्वप्न भंगले अन्‌ आईही गेली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

बीड - आईही गेली आणि पैसे नसल्याने वैद्यकीय प्रवेश यादीत नाव असूनही प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे डॉक्‍टर होऊन मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांचे पांग फेडण्याच्या तिच्या स्वप्नाचे काय, असा प्रश्न आहे.

साळिंबा (ता. वडवणी) येथील सरस्वती व अशोक जाधव या दांपत्याला शीतलसह मच्छिंद्र, अतुल अशी तीन अपत्ये. अडीच एकर जिरायती शेतीसह मजुरी करीत त्यांनी मुलांचे शिक्षण केले. 

अतुल जाधव फोटोग्राफी, तर मच्छिंद्र खासगी दवाखान्यात काम करून बी.एस्सी. नर्सिंगच्या शिक्षणाचा खर्च भागवितो. दहावीत ८२ टक्के गुण मिळविलेल्या शीतलला डॉक्‍टर होण्याचे स्वप्न होते. याच जिद्दीपोटी ती लातूरला गेली. 

मागच्या वर्षी तिला होमिओपॅथी शाखेला प्रवेश मिळत होता; मात्र एमबीबीए होण्याचे स्वप्न असल्याने तिने रिपीट केले; मात्र आर्थिक कुवतीमुळे तिला चांगल्या शिकवण्या लावणे शक्‍य झाले नाही. तरीही तिचे यंदा दंतवैद्यकीय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीच्या यादीत नाव होते. १८ ऑगस्टपर्यंत एक लाख ६७ हजार रुपये (ईबीसी सवलतीमुळे निम्मे शुल्क) भरून प्रवेश निश्‍चित करायचा होता; मात्र पैशांची जुळवणी झाली नाही आणि तिचा प्रवेश हुकला. यातूनच तिची आई सरस्वती जाधव यांनी आत्महत्या केली. 

एमबीबीएसनंतर दंतवैद्यक शाखेचा क्रमांक आहे. दुसऱ्या प्रयत्नात तिने यश मिळविले; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ती प्रवेश घेऊ शकली नाही. 
पैशाच्या जुळवणीचे टेन्शन आणि अपुऱ्या माहितीमुळे तिने ‘रिटेश्न’ हे ऑप्शन भरले नाही. यादीत प्रवेश रद्द असा शेरा तिच्या नावासमोर लागला आहे. यामुळे आता तिचे दुसरे वर्षही वाया गेले. आता पुढे काय, असा प्रश्न तिच्यासमोर आहे.

नोकरी, मदतीची मागणी 
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शीतल जाधवला वैद्यकीय शाखेत प्रवेश घेता आला नाही. याच कारणाने तिच्या आईने आत्महत्या केल्याने जाधव कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घ्यावे, आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी समाजबांधवांनी आज केली. याबाबत तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Web Title: Shital Jadhav Dream Doctor Medical Admission