प्रभू रामचंद्राच्या भूमीच्या दर्शनाने सार्थक झाले; शिवसैनिकांची भावना

Shiv Sainiks react on Uddhav Thackerays grand Ayodhya rally
Shiv Sainiks react on Uddhav Thackerays grand Ayodhya rally

हिंगोली : अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या पावनभुमीचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२४) 'सकाळ'शी दूरध्वनीवरून बोलताना दिली. 

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अयोध्या येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हयातून मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

या कार्यक्रमासाठी हिंगोली येथून निघाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत झाले. त्यानंतर शुक्रवारी (ता.२३) रात्री बारा वाजता जिल्हयातील काही पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले. त्यानंतर हळूहळू मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत.

''अयोध्या प्रभू रामचंद्रांची जन्मभुमी हा शब्द आता पर्यंत अनेक वेळा ऐकण्यात आला. मात्र आता या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याचा योग आला आहे. अयोध्येमधे पोहोचल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहिले. ठिकठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या स्वागताचे फलक, भगवे ध्वज, पताका यामुळे हा परिसरच भगवामय झाला आहे. परिसरातील वातावरण पाहून अंगावर रोमांच उठले आहेत. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या पावनभूमीचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक झाले आहे. या ठिकाणी होणारे स्वागत अन नागरिकांचे सहकार्य यामुळे भारावून गेलो'',  असे  बांगर यांनी सांगितले.

यावेळी बांगर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी राम कदम, जिल्हा परिषद सदस्य फकीरराव मुंडे व पदाधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करतांना यापुढे पक्षादेश आल्यानंतर महाराष्ट्रातून अयोध्येला पोहोचणारे पहिले पथक हिंगोली जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व कायकर्त्यांचे असेल असा विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com