शिवसेना कार्यकर्त्यांकडून महापालिकेमध्ये तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

परभणी - शहरात एलबीटीच्या मुद्यावरून वाद सुरू असतानाच शिवसेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी (ता. 27) येथील महापालिकेत घोषणाबाजी करीत दाखल झाले आणि त्यांनी आयुक्तांच्या दालनातील काचा फोडल्या. या प्रकरणी शिवसेनेचे अनिल डहाळे यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून "एलबीटी'च्या वसुली एजन्सीचे काम थांबवावे, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी "बंद' पुकारला आहे. "बंद'चा आजचा दुसरा दिवस होता. त्यातच दुपारी चारच्या सुमारास शिवसेनेच्या नगरसेवकांसह काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते महापालिकेत आले. प्रचंड घोषणाबाजी करून त्यांनी आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला. त्या ठिकाणी घोषणाबाजी करून त्यांनी आयुक्तांच्या टेबलवरील काच फोडली; तसेच दालनाबाहेरील दरवाजाच्या काचाही फोडल्या. यात महापालिकेतील एक कर्मचारी जखमी झाला. या प्रकरणी रात्री साडेआठला नवा मोंढा पोलिस ठाण्यात उपायुक्त जगदीश मानमोठे यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीत अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, ज्ञानेश्वर पवार, बबलू नागरे, गोविंद पारटकर, दिलीप गिराम, गजानन शहाणे, संभानाथ काळे, राजू भिसे, मारुती थिटे यांच्यासह 20 ते ते 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: From Shiv Sena activists vandalized in the municipal