आगामी निवडणुकीत शिवसेनेशी युतीसाठी प्रयत्न - निलंगेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

लातूर - नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती राहिली असती तर आज चित्र वेगळे राहिले असते, आम्ही युतीसाठी प्रयत्न केला पण शिवसेनेने का नाकारला हे लक्षात आले नाही. आता मागचे सर्व विसरून जाऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनीही एक पाऊल पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

लातूर जिल्ह्यात चारपैकी दोन नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची मतदारांनी दिलेली ही पावती आहे. जिल्ह्यात आमचे सहा नगरसेवक होते, आता ४८ झाले आहेत. सर्वाधिक मते घेणारा पक्ष भाजपच ठरला आहे. शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. युती झाली असती तर आणखी चित्र वेगळे राहिले असते. पण त्यांनी युती नाकारली. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या निवडणुका आहेत. शिवसेनेसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हाध्यक्षांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मागचे सारे विसरून जाऊन शिवसेनेने पुढे आले पाहिजे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचा निश्‍चित फायदा होईल. राज्यात एकत्र व जिल्ह्यात वेगळे कशासाठी, असा प्रश्नही श्री. निलंगेकर यांनी यावेळी उपस्थित केला. 

पालकमंत्री पद सिद्ध करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा असे एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. निलंगेकर म्हणाले. लातूर जिल्ह्यातून टेंभुर्णी लातूर, जहिराबाद लातूर, रत्नागिरी नागपूर हे हायवे जात आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या तीनही हायवेचे लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकत्रित भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. निलंगेकर यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरुके, प्रवीण कस्तुरे उपस्थित होते. 

निलंगेकर म्हणून अन्याय नको
निलंग्यात एक निलंगेकर गेले अन्‌ दुसरे निलंगेकर आले असे म्हणून माझ्यावर अन्याय करू नका. मी एका कुटुंबाशी निगडित आहे.  निलंग्यातील प्रत्येक माणूस हा निलंगेकर आहे. लोक नाव नाही तर काम पाहत असतात. माझे कुटुंब पूर्णवेळ काम करीत आहे. त्यामुळे लोक माझ्यासोबत आले. त्यामुळे एक गेले व दुसरे निलंगेकर आले म्हणणे माझ्यावर अन्याय केल्यासारखे होईल, असे श्री. निलंगेकर म्हणाले.

Web Title: Shiv Sena alliance for the upcoming elections to