जाळपोळ प्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना अटक

मनोज साखरे
मंगळवार, 15 मे 2018

औरंगाबाद - शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना दंगलीतील जाळपोळ प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली. जंजाळ यांची त्यांच्या शिवाजीनगर येथील घरी दोन पोलिस उपयुक्त सहायक आयुक्तांद्वारे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना दुपारी बाराच्या सुमारास क्रांतिचौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 

घरात चौकशी सुरू असताना प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे आदी नेत्यांनी जंजाळ यांच्या घरी हजेरी लावली होती. चौकशीवेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली यावेळी काहीसा तणाव झाला होता. 

चौकशीनंतर जंजाळ याना क्रांतीतिचौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना रितसर अटक करण्यात आली. यावेळी पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमला. पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला असून, जंजाळ याना न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena corporator Rajendra Janjal was arrested in the case of arson