पोलिसांच्या विरोधात शिवसेनेचा शनिवारी हिंदू शक्ती मोर्चा

माधव इतबारे
गुरुवार, 17 मे 2018

औरंगाबाद : गेल्या शुक्रवारी (ता.11) घडलेल्या दंगलीनंतर पोलिस हिंदूंचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांनाच टार्गेट करत असून, एमआयएमचे दंगेखोर नगरसेवक अद्याप मोकाट आहेत. आमचा पोलिसांवर विश्‍वास राहिलेला नाही, एकतर्फी कारवाई शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी (ता. 17) दिला.

पोलिसांच्या निषेधार्थ शनिवारी (ता. 19) जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू शक्ती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खैरे यांनी जाहीर केले. 

शहरात शुक्रवारी घडलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ व कार्यकर्ते लच्छू पहेलवान उर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक केली आहे.

या पार्श्‍वभूमिवर खैरे म्हणाले, दगड समोरून येत होते. शिवसैनिकांनीच हिंदू नागरिक व पोलिसांचे संरक्षण केले. आता त्याच शिवसैनिकांवर पोलिस कारवाई करत आहेत. घटनेच्या दिवशी पोलिस आयुक्त शहरात नव्हते, दोन उपायुक्त सुटीवर होते. 

Web Title: Shiv Sena to protest against Aurangabad Police