पिक विम्याच्या प्रश्नावर शिवसेनेचे 'जेल भरो' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

परभणी : शेतकऱ्यांना पिकविमा सरसकट व त्वरित वाटप करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी शुक्रवारी (ता.15) जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.

खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सकाळी 11 वाजता सुरु झाले.

धर्मापूरी (ता.परभणी) येथे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी स्वताला अटक करून घेतली. शेतकऱ्यांना पिकविमा सरसकट व त्वरीत वाटप करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले, जो पर्यत शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा मिळत नाही तो पर्यत शिवसेना गप्प बसणार नाही. आज जेलभरो आंदोलन करून सरकारला इशारा देत आहोत. परंतू यापुढे जर त्वरीत पिकविमा दिला गेला नाही तर हेच आंदोलन तिव्र करावे लागेल.

जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ या तालुक्यातही जेलभरो आंदोलन करण्यात आले. हजारो शिवसैनिकांनी स्वताला अटक करून घेतली आहे.

Web Title: Shiv Sena protests for Crop insurance issue in Parbhani