अडिच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल- आमदार अब्दुल सत्तार

प्रकाश बनकर
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद: भाजपतर्फे काय वक्‍तव्य केली जात आहे. हे मला माहित नाही. मात्र, 7 तारखेच्या आत सत्ता स्थापन होत. अडिच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी "सकाळ' बोलताना केला आहे. मुंबईहून परतलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 

राज्यात मुख्यमंत्री कोणाचा यावरून सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे भाजप सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवा-जुळव करीत आहे. तर दुसरीकडे शिवसेना लोकसभा निवडुकीत जे ठरले त्या नियमावर अडून आहे. तसेच शिवसेनेतर्फेही मुख्यमंत्री पदाच्या मागणीसाठी दबावतंत्र वापरले जात आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 7 तारखेच्या आत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल. असा थेट इशारा शिवसेनेला दिला आहे. त्याच्या वक्‍तव्यावर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खरमरीत उत्तर दिले आहे.

सत्तार म्हणाले, शिवसेनेला वेळेत सत्ता स्थापन होईल. भाजपने काय वक्‍तव्य केले मला माहित नाही. मात्र सात तारखेच्या आत सत्ता स्थापन होईल.आणि अडिच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील. राष्ट्रपती राजवटी विषयी सत्तार म्हणाले, शिवसेनेला सगळे नियम आणि धोरण माहिती आहे. कोणत्याही राजवटीला आम्ही घाबरत नाही. आमचा सत्ता येणार आणि आमचा मुख्यमंत्री होणारच असेही सत्तार म्हणाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena will be chief minister for two and a half years - MLA Abdul Sattar