लोकवर्गणीतून उभारले शिवाजी महाराजांचे मंदिर

बाळासाहेब लाेणे
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नांदेडा (ता. गंगापूर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. यासाठी गावातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श ठेवून येथील गावचा गावगाडा चालणार आहे. यासाठी ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोर सतत छत्रपती दिसावेत, अशी यामागची भावना आहे.

गंगापूर, ता. 17 (जि.औरंगाबाद) : नांदेडा (ता. गंगापूर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. यासाठी गावातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श ठेवून येथील गावचा गावगाडा चालणार आहे. यासाठी ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोर सतत छत्रपती दिसावेत, अशी यामागची भावना आहे.

स्वातंत्र्यदिनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रशांत बंब, डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांच्यासह समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती. बारा लाखांच्या लोकवर्गणीतून हा उपक्रम पूर्णत्वाला नेण्यात आला आहे. मंदिराचे शिल्पकार कचरू जगन्नाथ राजगुरू आहेत.

मंदिर निर्माण समितीत अध्यक्ष देवचंद मते, उपाध्यक्ष भरतकुमार मते, सदस्य ज्ञानेश्वर काळे, हरिदास कान्हारे, गुणधर काळे, आबासाहेब मते, मनोज मते, सोमिनाथ मुळे, गजानन मते, गोकुळ शिंदे, परमेश्वर काळे, राजेंद्र मते यांचा समावेश आहे.

शिवाजी महाराजांच्या
कार्यकर्तृत्वाला उजाळा

या मंदिराची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा असून, मंदिर पाहण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाने, स्वतःच्या हिमतीवर केली. त्यासाठी मावळ्यांना सोबत घेतले. शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला या मंदिराच्या निमित्ताने उजाळा मिळणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj Temple built through public money