esakal | इतर ग्राहकांना प्रवेश, पण 'शिवभोजन' घेणाऱ्यांना फक्त 'पार्सल'
sakal

बोलून बातमी शोधा

shivbhojan

१० रुपयांना शिवभोजन थाळी देऊन गरीब आणि गरजूंचे पोट भरण्याचा ठाकरे सरकारचा उद्देश होता

इतर ग्राहकांना प्रवेश, पण 'शिवभोजन' घेणाऱ्यांना फक्त 'पार्सल'

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लातूर- मोठा गाजावाजा करत शिवभोजन थाळी योजनेची सुरुवात करण्यात आली. १० रुपयांना शिवभोजन थाळी देऊन गरीब आणि गरजूंचे पोट भरण्याचा ठाकरे सरकारचा उद्देश होता. उपक्रम स्तुत्य होता. पण, सर्व सरकारी योजनांचे होते, तेच या शिवभोजन थाळी योजनेचं होताना दिसत आहे. योजना चांगल्या असतात, पण त्याच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणा वारंवार दिसून येतो. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आता कथित शिवभोजन थाळी ५ रुपयांना करण्यात आली आहे. पण, शिवभोजन थाळीच्या नावावर गरीब आणि गरजू लोकांची थट्टा सुरु असल्याचं आपल्याला म्हणावं लागेल.

लातूरच्या एस टी उपहार गृहावर शिवभोजन थाळीच्या नावाने प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये बांधून ठेवलेल्या चपात्या, भात आणि डाळ दिली जात आहे. इतर ग्राहकांना उपहार गृहात बसून खाण्याची सोय आहे,  पण कथित शिवभोजन थाळी घेणाऱ्यांना तिथे बसण्याची परवानगी नाही. त्यांच्या हातात पार्सल द्यायचं, त्यांचा एक फोटो काढायचा आणि आपलं काम झालं असं समजायचं, अशाप्रकारचे काम सुरू आहे. केवळ येथेच नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी असेच केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.  गरिबांना उपहार गृहात बसू द्यायचं नाही किंवा त्यांना खाण्यासाठी 'थाळी'ही द्यायची नाही म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखं आहे. 

तोंडावर मास्क, कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच शबरीमला मंदिरात प्रवेश

राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. शिवभोजन थाळीचा मोठा गाजावाजा करण्यात येत असला तरी वास्तवात चित्र वेगळे दिसून येत आहे.  जेवन दिलं जातं आहे, पण ते खाण्यायोग्य आहे का? किंवा कथित शिवभोजन थाळीची सेवा पुरवणारे ग्राहकांना योग्य वागणूक देत आहेत का, हेही पाहाणं महत्वाचं आहे. कमी पैशात जेवण देणे ठीक पण सन्मानाने खाता यावे हेही त्यात अंतर्भूत असायला हवे. नाहीतर आज 'इतक्या' जणांना शिवभोजन थाळी देण्यात आली याची केवळ आकडेवारी जाहीर करून आनंद व्यक्त करण्याशिवाय दुसरं काहीही मिळवता येणार नाही.