शिवलिंगेश्‍वर भजन मंडळाचा असाही अनोखा उपक्रम : कसा, ते वाचायलयाच पाहिजे

प्रमोद चौधरी
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

होऊनि वैष्णव
जो कां निंदी सदाशिव...
त्याचे न पहावे वदन
मुर्खाहूनि मूर्ख पूर्ण...
मनातील सर्व भेदाभेद नष्ट करण्यासाठी वैष्णव बनावे लागते. नियमित उपासना करावी लागते. विष्णू व शिव एकच आहेत. सातत्याने नाम घेतल्यानेच शिव देखील वैष्णव बनले, असे जनार्दन स्वामींनी वरील अभंगातून विश्‍वाला संदेश दिला आहे.

नांदेड : सिडकोतील भाविक नियमित सर्वप्रकारचे भेदभाव विसरून एकविचाराने २२ वर्षांपासून शिवनामाचा गजर करीत आहेत. शिवाय कपीलधारा येथे १६ वर्षांची पायी दिंडीचीही परंपरा अखंडित सुरु आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत शिवभक्त सेवा मंडळ ट्रस्टच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाचीही थाप देतात.


सिडकोतील शिवलिंगेश्वर भजन मंडळातील सदस्य नियमित भजन-गायन करतात.

नांदेड शहरापासून १३ ते १४ किलोमीटर अंतरावर सिडको वसाहत आहे. खड्ड्यांतून वाट'काढत सिडकोत पोचावे लागते. सिडकोत पोचल्यावर एनडी-चार भागामध्ये रामनगर वसाहत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ १९९५ मध्ये शिवलिंगेश्‍वर महादेव  मंदिराची उभारणी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत झाली. तेव्हापासून दररोज पाच ते सहा शिवपाठ, शिवरात्रीला, दर सोमवारी नियमित भजन, मन्मथ स्वामी, बसवेश्‍वर जयंतीला तसेच मंदिराच्या वर्धापनदिनी कीर्तन सोहळा आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो. श्रावण महिन्यामध्ये महिनाभर शिव अनुष्ठाण होते.

हेही वाचा - राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही मुंबईत शंकरराव चव्हाणांचे घर नव्हते- अशोक चव्हाण

प्रत्येकवर्षी कार्तिक महिन्यामध्ये बाराजी भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ वर्षांपासून पायी दिंडी जाते. यामध्ये ५०० ते ६०० शिवभक्त सहभागी होऊन टाळ-मृदंगाच्या गजरात आणि शिवनामाच्या जयघोषात पावली खेळण्यात दंग होऊन जातात. शिवाय श्रावण महिन्यामध्ये काळेश्‍वरला तर नवरात्रामध्ये रत्नेश्‍वरीला देखील मंडळातर्फे पायी दिंडी काढली जाते.

मंडळातील सदस्यांचे प्रयत्न प्रेरणादायी

सामाजिक उपक्रमही मंडळाच्या वतीने नियमित राबविले जातात. दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून शिवभक्त सेवा मंडळाच्या सहकार्याने गौरव होतो. मंदिर मरिसरामध्ये मंगलकार्यालाचीही सुविधा ट्रस्टतर्फे केली आहे. वाचनकट्ट्याचीही व्यवस्था आहे. समाजातील सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून हरिनामामध्ये गुंतून घ्यावे, एकोप्याने राहावे यासाठी मंडळातील सदस्यांचे प्रयत्न प्रेरणादायी असेच आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - खेळण्या बागडण्याच्या वयातच अंगमोड मेहनत : काय होत आहे परिणाम, ते वाचा

यांचा आहे समावेश
मंडळामध्ये हरिभाऊ नेरनाळे, बालाजी भुरे, विश्‍वनाथ पांडागळे, सदानंद लंगडे, बालाजी नळगे, श्रीराम एकनाथराव देशमुख (ट्रस्टी), नागोराव देशमुख, अर्जुन रामकिशन गुंडाळे (तबला), आर. जी. लखेकर, सिद्धेश्‍वर अप्पा जळकोटकर, शिवाजी कुलुलवाड, मनोहर लांडगे, मयूर बरगळ, रजाबाई शंकरराव सोलापुरे, कमलबाई श्रीराम देशमुख, चंद्रकलाबाई बाबूराव मडके, विठ्ठलराव पाटील शेळगावकर, दिगंबर मानसपुरे आदी शिवभक्तांचा नियमित सहभाग असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivlingeshwar Bhajan Mandal also has a Unique Program Nanded News