शिवसैनिकांची नळदुर्ग-तुळजापूर पदयात्रा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे शिवसेनेच्या नळदुर्ग शहर शाखेतर्फे शुक्रवारी (ता.29) नळदुर्ग ते तुळजापूर अशी भवानी ज्योत घेऊन पदयात्रा काढून आनंद व्यक्‍त करण्यात आला.

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद)  : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे शिवसेनेच्या नळदुर्ग शहर शाखेतर्फे शुक्रवारी (ता.29) नळदुर्ग ते तुळजापूर अशी भवानी ज्योत घेऊन पदयात्रा काढण्यात आली. या उपक्रमाला महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या समर्थकांनीही या वेळी भगवे फेटे परिधान केले होते. 

बीडमधून धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके की संदीप क्षीरसागर?

नळदूर्ग शहरातून मिरवणूक 
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकाळी अकराला शहरातून मिरवणूक काढत बसस्थानक परिसरात शिवसेनेच्या पदयात्रेला पाठिंबा दिला. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, नगरसेवक विनायक अहंकारी, माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी, बसवराज धरणे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शब्बीर कुरेशी, नगरसेवक मुश्‍ताक कुरेशी, माजी शहराध्यक्ष महेबूब शेख, अजित झुनैदी आदी उपस्थित होते. त्यानंतर भवानी ज्योत घेऊन शिवसेना कार्यकर्ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रवाना झाले. 

जाणून घ्या - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया

अनेकांचा सहभाग 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानिमित्त तुळजाभवानी मातेची खणानारळाने ओटी भरण्यात येणार असल्याचे शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी सांगितले. माजी तालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर घोडके, सुनील गव्हाणे, सोमनाथ म्हेत्रे, श्‍याम कनकधर, रणजित डुकरे, खंडू माने, नेताजी महाबोले, शंकर विभुते, राजा ठाकूर आदी या पदयात्रेत सहभागी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsainik Naldurg-Tuljapur Yatra