परभणी: शिवसेनेकडून चक्काजाम आंदोलनास सुरवात

गणेश पांडे
शनिवार, 5 मे 2018

शेतकऱ्यांना न मिळालेला पिक विमा, बोंड अळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले अनुदान यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन शनिवारी, ता. ५ मे सुरु करण्यात आले आहे.

परभणी : कृषि विभागासह रिलायन्स कंपनीने शेतकऱ्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.पाच) जिल्हयातील सर्व तालुक्यात रस्ता रोको सुरु आहेत. 

शेतकऱ्यांना न मिळालेला पिक विमा, बोंड अळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले अनुदान यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन शनिवारी, ता. ५ मे सुरु करण्यात आले आहे.

झरी, पेडगाव, पोखर्णी (ता.परभणी) येथे सकाळपासूनच शिवसैनिक व शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. परभणी शहरात येणारे चारही रस्ते चक्काजाम आंदोलनामुळे बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न केला आहे. ठिक - ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: ShivSena agitation against government in Parbhani