कर्जमाफीसाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसह सोमवारी (ता. 10) येथील क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे', अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनात लोकप्रतिनिधींसह शिवसेना व त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले.
Web Title: shivsena agitation for loanwaiver