उद्धवसाहेब शेतकऱ्यांना जगवा; शेतकऱ्यांचा टाहो

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

नांदेड : गेल्या पंधरा दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी (ता. पाच) नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी जानापूरी (ता. लोहा) येथील शेतीवर जाऊन पाहणी केली. यावेळी उद्धव साहेब शेतकऱ्यांना जगवा असा टाहो शेतककऱ्यांनी फोडला.  

गेल्या पंधरा दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजही शेतात गुडघाभर पाणी असून, पिकावर बुरशी चढली आहे. या भयावह परिस्थितीत शेतकरी हैराण झाला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदेडला येत आहेत. सकाळी दहा वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी विश्रांती न घाता थेट जानापूरी (ता. लोहा) येथील शेतककऱ्यांच्या बांधावर गेले. तेथे शेतककऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर मी आपल्या सोबत आहे असा विश्‍वास दिला. यावेळी शेतकककऱ्यांना जगवा असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु तराळले. आमचे आपणच मालक आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर ते लोहाकडे रवाना झाले. या तालुक्यातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष शेतात जावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा आणि त्यांना धीर देण्यासाठी ते संबोधित कककरित आहेत. त्यानंतर ते कंधार तालुक्यात जातील आणि तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते अहमदपूरकडे रवाना होतील.

रविवारी (ता. दोन) जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्यातील एकूण वीस गावांना भेटी देवून शेतीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या पाच दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी येत असल्याने सर्व शिवसैनिकांनी नांदेड विमानतळावर गर्दी कककेली होती. उद्धव ठाकककरे यांच्या समवेत सार्वजनीक  बांधकाममतंरी एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षिरसागर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे व शिवसेनेच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com