शिवसेनेने घेतली विभागीय क्रीडा संकुलाची झाडाझडती 

संकेत कुलकर्णी
शनिवार, 26 मे 2018

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सीमा चक्रनारायण, कान्हू चक्रनारायण, राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे, सुधीर जाधव, सुंदर वायाळ, पंकज वाडकर, जगदीश वेताळ, अनिल कोंडपल्ले, सुमित लखन, विष्णू कापसे, सुनील जाधव यांनी शुक्रवारी (ता. 25) दुपारी विभागीय क्रीडा संकुलातील खेळाडूंसाठीच्या सुविधांची पाहणी केली.

औरंगाबाद : मराठवाड्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी उभारलेल्या विभागीय क्रीडा संकुलात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खेळाडूंच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेनेने धडक मारून वसतिगृहांची झाडाझडती घेतली. दोन दिवसांत सुविधांचा अभाव दूर करा, नसता चांगला धडा शिकवू, असा इशाराही क्रीडा विभागाला दिला. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सीमा चक्रनारायण, कान्हू चक्रनारायण, राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे, सुधीर जाधव, सुंदर वायाळ, पंकज वाडकर, जगदीश वेताळ, अनिल कोंडपल्ले, सुमित लखन, विष्णू कापसे, सुनील जाधव यांनी शुक्रवारी (ता. 25) दुपारी विभागीय क्रीडा संकुलातील खेळाडूंसाठीच्या सुविधांची पाहणी केली. मुलामुलींच्या वसतिगृहांत पिण्यासाठी पाणी नाही, नीट गाद्या-बेडशीट नाहीत, अस्वच्छ प्रसाधनगृहे, थेट बाथरूमपर्यंत कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून आले. मैदानावर धुळीचे साम्राज्य, घाणीने भरलेले पॅव्हेलियन अनेक दिवसांपासून स्वच्छ केले नसल्याबद्दल श्री. दानवे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी एकही क्रीडा अधिकारी जागेवर नसल्याचे त्यांना आढळून आले. 

सोमवारपर्यंत (ता. 27) विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, नसता शिवसेना स्टाईल धडा शिकवू, असा इशाराही अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: ShivSena complaint for sports complex

टॅग्स