शिवसेनेचे माजी खासदार प्रदिप जैस्वाल यांना अटक 

मनोज साखरे 
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार व महानगरप्रमुख प्रदिप जैस्वाल यांना रविवारी मध्यरात्री क्रांती चौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले आहे. 

औरंगाबादेत 11 व 12 मे रोजी घडलेल्या दंगली नंतर पोलीसांनी धरपकड सुरु केली आहे. गांधीनगर भागातून रविवारी (ता. 20) रात्री पोलीसांनी दंगलीत सहभाग असल्याच्या संशयावरुन चार जणांना ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले होते. या संशयीतांना सोडवा अशी मागणी माजी खासदार प्रदिप जैस्वाल यांनी रविवारी मध्यरात्री क्रांतीचौक पोलीसांत येऊन केली होती.

याप्रकरणात पोलीसांनी सोडण्यास नकार दिला. यात वादावादीनंतर जैस्वाल व समर्थकांनी पोलीस ठाण्यात खुर्च्यांची फेकाफेक करत तोडफोड केली. रविवारी मध्यरात्री घडल्या या घटनेत त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद झाला. त्यानंतर पोलीसांनी त्यांना सोमवारी (ता. 21) दुपारी निराला बाजार येथील त्याच्या घरुन ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास त्यांची घाटीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात रवाना करण्यात आले.

Web Title: shivsena former mp pradip jaiswal arrested in aurangabad