हिंगोलीत शिवसेनेचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 शिवसेनेच्यावतीने  सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले.

हिंगोलीत शिवसेनेचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन

हिंगोली : किरीट सोमय्या हे देशद्रोही आहेत त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून केंद्राने त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, असा आरोप करत गुरुवारी (ता. सात) शिवसेनेच्यावतीने सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. रँली काढुन घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चप्पल बुटाने मारहाण करून त्यांचा निषेध करण्यात आला आहे.

हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला गुरुवारी चप्पल बुटाने मारहाण करून त्यांचा निषेध करण्यात आला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत.१९७१ च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'आयएनएस विक्रांत' युद्धनौकेवर युद्धाचे स्मारक बनवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्यांकडून तब्बल ५८ कोटींचा निधी गोळा केला.

मात्र, हा निधी नंतर त्यांनी राज्य सरकारकडे सोपवलाच नाही. स्वत:च्या निवडणुकीसाठीच त्यांनी हा पैसा वापरला.यातील मोठी रक्कम त्यांनी मुलाच्या कंपनीत टाकली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किरीट सोमय्या हे देशद्रोही आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून केंद्राने त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे असा आरोप करत शिवसेनेच्या वतीने हिंगोलीत सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चप्पल बुटाने मारहाण करून त्यांचा निषेध करण्यात आला आहे.

तसेच शिवसेनेच्या वतीने शहरातून रॅली काढत किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गनाजी बेले,सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे,डॉ.रमेश शिंदे, उद्धवराव गायकवाड, दिलीप बांगर सुभाष बांगर, श्रीराम बांगर ,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, माऊली झटे,रामजी नागरे उपजिल्हाप्रमुख डी. के. दुर्गे परमेश्वर मांडगे, सखाराम उबाळे, भानुदास जाधव,अंकुश आहेर, आनंदराव जगताप,साहेबराव देशमुख, संतोष देवकर, अनिल देशमुख,नगराध्यक्ष कपिल खंदारे, उत्तमराव शिंदे, गोपु पाटील अनिल देव, जगन्नाथ देशमुख सुरेशराव कुंडकर, प्रवीण महाजन, जगदीश गाढवे, निखिल देशमुख,शिवाजीराव मुटकुळे, विजय पाटील बोंढारे,जयदीप काकडे, सीमा पोले, राजू पाटील कऱ्हाळे, दत्तराव इंगळे, सचिन पेंढारकर, लखन शिंदे, संतोष जगताप,दादाराव डुरे, राजाभाऊ मुसळे, ज्ञानेश्वर जाधव,दिलीप राठोड,प्रदीप कणकुटे,राहुल दंतवार, मनोज देशमुख शिवाजी कऱ्हाले,मारोतराव खांडेकर,पंढरी मगर,नितीन होकर्णे,श्यामराव फटींग,शंकरराव यादव,मयुर शिंदे, आदी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

Web Title: Shivsena Kirit Somaiya Hingoli Protest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..