या आमदाराने दिले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेचे काही देणे लागतो, या भावनेतून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

उस्मानाबाद : राज्यात कोरोना विषाणू फोफावत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवेसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी दिली. 

लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेचे काही देणे लागतो, या भावनेतून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

राज्यात कोरोना विषाणू फोफावत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत या जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. अशावेळी आर्थिक मदतीची गरज भासणार असल्याने जनतेचे काही देणे लागतो, या भावनेतून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय 

देशात व राज्यात सध्या कोरोना विषाणू फोफावत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अर्थातच आर्थिक पाठबळाचीही मोठी गरज भासणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साह्यात निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वेतनाचा धनादेश सुपूर्द करणार असल्याचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने संचारबंदी व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि जीवघेण्या रोगापासून राज्यातील जनतेचे लक्षण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण  मंत्रिमंडळ, प्रशासनातील अधिकारी, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे.

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

देशातील कोरोनाग्रस्ताची संख्या पाचशेच्या पार पोचली आहे. राज्यातही कोरोणा विषाणू फोफावत असल्याचे चित्र आहे. अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. अशावेळी आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. शिवसेना पक्षाचे धोरण ८० टक्के समाजकाकरण व २० टक्के राजकारण असेच राहिले आहे. त्यानुसार एक महिन्याचे वेतन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MLA Donates Salary To CM Relief Fund Maharashtra Coronavirus News Osmanabad