शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

औरंगाबाद - दंगल प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांविरुद्ध झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ पोलिसांविरुद्ध शनिवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिस विभागाने परवानगी नाकारली आहे. मोर्चा शांततेत निघाल्यास ठीक; परंतु कायदा व सुव्यवस्थेला तडा गेला, तर गुन्हे नोंदविण्यात येतील, अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. दंगलीनंतर पोलिस हिंदूंचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांनाच टार्गेट करीत असून, एमआयएमचे दंगेखोर नगरसेवक अद्याप मोकाट असल्याचाा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

Web Title: shivsena rally permission reject