औंढा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; सेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पाच जागा

१७ जागांसाठी सुरु झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती.
hingoli
hingolisakal

हिंगोली : जिल्ह्यात औंढा नागनाथ नगर पंचायत(oundha nagnath ) निवडणुकीत १७ पैकी ९ जागा शिवसेनेने काबीज केल्याने विजयश्री स्पष्ट बहुमत मिळविले आहे . मात्र सेनगाव खेचत सेनेचा भगवा फडकविला मात्र सेनगाव नगरपंचायतीत एकाही पक्षाला बहुतमत मिळाले नाही या दोन्ही नगरपंचायती मंगळवारी ता. १९ मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. हिंगोली (hingoli)जिल्हयातील औंढा नागनाथ व सेनगाव नगर पंचायतीची निवडणुक प्रक्रिया पार पडत्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली होती. औढा नागनाथ येथे १७ जागांसाठी सुरु झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. संपूर्ण १७ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

hingoli
शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले

यात शिवसेनेने नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे . या ठिकाणी शिवसेनेला नऊ , काँग्रेस चार , भाजपा दोन , वंचित आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. विजयी उमेदवारात शिवसेनेचे दिलीप राठोड , सपना कनकुटे, शितल पवार , राजू खंदारे , राहूल दंतवार , जया देशमुख , साहेबराव काळे , अनिल देव , मनोज काळे यांचा समावेश आहे.काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये शेख गजाला बेगम , महमद आसेफ इनामदार , कुंताबाई गोबाडे , सुनीला जावळे यांचा समावेश आहे . वंचित आघाडीच्या उमेदवारामध्ये शेख गोरोबी रशीद , रेश्मा महेमुद शफी यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या दीपाली पाटील , अश्विनी पाटील यांचा समावेश आहे.

hingoli
सत्तारांचा दानवेंना 'दे धक्का', सोयगावात शिवसेनेचा भगवा

सेनगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी , भाजपा यांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या असून काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी आता दुसऱ्या पक्षाच्या आधार घ्यावा लागणार आहे. तीनही प्रमुख पक्षांना प्रत्येक पाच जागा मिळाल्या आहेत. . या ठिकाणी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांमध्ये यमुनाबाई देशमुख,शिलानंद वाकळे , ज्योती देशमुख , शीलाबाई कोकाटे , निखील देशमुख यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांमध्ये गायत्री देशमुख , मनीषा देशमुख, शालीनी देशमुख , उषा मानकर , स्वाती बहिरे यांचा समावेश आहे . भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये अमोल तिडके, अंजली देशमुख , राधा देशमुख , मीरा खाडे , प्रयागबाई फटांगळे यांचा आहे . तर काँग्रेसच्या विमलबाई गाढवे , ओमप्रकाश देशमुख यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com