'शिवशाही' चढली पुलाच्या कठड्यावर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

बसचालक कामाजी बालाजी पवार यांचा बसवरील ताबा सुटला आणि बस मुरूडजवळच रस्त्याकडेला असलेल्या पुलाच्या कठड्यावर चढली. काही फूट बस तशीच पुढे गेली.

लातूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘शिवशाही’ बसच्या अपघाताची मालिका अजूनही सुरूच आहे. लातूर जिल्ह्यातही शिवशाही बसचा रविवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात शिवशाही रस्त्याकडेला असलेल्या पुलावरच चढली. त्यामुळे एक प्रवासी बाहेर फेकला गेला. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.

कोल्हापूर-नांदेड या मार्गावर शिवशाही स्लिपर बस धावते. या मार्गावरील एमएच ०३ सीपी ४५४४ ही बस आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे पोचली. अरूंद रस्त्यावर समोरून वाहन येत असल्याचे लक्षात येताच बसचालक कामाजी बालाजी पवार यांचा बसवरील ताबा सुटला आणि बस मुरूडजवळच रस्त्याकडेला असलेल्या पुलाच्या कठड्यावर चढली. काही फूट बस तशीच पुढे गेली आणि पुलावर लटकली. त्याचवेळी दारात उभा असलेला राजेश गणपत देवसरकर (रा. देवसरी जि. यवतमाळ) हा प्रवासी बाहेर फेकला गेला. अपघातात तो गंभीर जखमी झाला. तर इतर दोनजण किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर लातूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये एकूण १३ प्रवासी होते. इतर प्रवासी सुरक्षित आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Shivshahi bus accident in latur