‘शिवशाही’ चा चालक मद्यधुंद अवस्थेत

चाकूर - प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर चालकाने हीच शिवशाही बस बसस्थानकात सोडून पळ काढला.
चाकूर - प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर चालकाने हीच शिवशाही बस बसस्थानकात सोडून पळ काढला.

चाकूर - नागपूरहून-लातूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवीत असल्यामुळे प्रवाशांनी याची माहिती वाहतूक नियंत्रकास देताच बसस्थानकात बस सोडून वाहनचालकाने पळ काढला. त्यामुळे अहमदपूरहून दुसरा चालक बोलावून बस लातूरकडे पाठविण्यात आली. 

शिवशाही बसचे अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत असताना अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सकाळी नागपूरहून लातूरकडे निघालेल्या बसमधील चालकाने अहमदपूर येथून मद्यधुंद अवस्थेत बस चालविण्यास सुरवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या प्रवाशांनी याची माहिती चाकूर येथील वाहतूक नियंत्रकास दिली. येथील बसस्थानकात अहमदपूर आगाराचे काही अधिकारी थांबलेले होते, त्यांना हा प्रकार प्रवाशांनी सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी चालकास बोलविले; परंतु यावेळी चालकाने बसस्थानकात बस सोडून पळ काढला. 

चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि  रस्त्याने वाहन व्यवस्थित चालवत नव्हता अशी तक्रार प्रवाशांनी केली. बसचालकाने पळ काढल्यामुळे अधिकाऱ्यांना त्याची चौकशी करता आली नाही. प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून लातूरकडे पाठविण्यात आले. अहमदपूर येथून दुसरा चालक बोलावून ही बस लातूरला पाठविण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर ते लातूर या लांबपल्याच्या प्रवासासाठी महामंडळाचे चालक देण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com