छत्रपतींच्या स्मारक भूमिपूजनाला उपस्थित राहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

बीड - मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला होणार आहे. याला जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (ता.२१) पत्रकार परिषदेद्वारे दिली. शिवाय या स्मारकाबाबत सर्वसामान्यांना माहिती मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत तीन हजार बॅनर तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी म्हणाले,  हा कार्यक्रम संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे ७० हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. यात महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलिपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे. ३६ महिन्यांतच स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत जिल्हावासीयांना माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून तीन हजार बॅनर बनविण्यात येत असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशेषतः सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे बॅनर लावण्यात येणार आहे. दोन दिवसांत हे बॅनर संबंधित कार्यालयांना वाटप केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी राम म्हणाले. या वेळी पत्रकार परिषदेस जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

विनायक मेटेंच्या फोटोला बगल
मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे आहेत; मात्र याबाबत जनजागृतीपर जिल्हा प्रशासनाकडून बनविण्यात येणाऱ्या बॅनरवर विनायक मेटे यांचा फोटो अथवा नावाचा उल्लेख नाही. त्यांच्या नावाला व फोटोला बगल दिल्याचे लक्षात आणून दिल्यावर या बॅनरचा फॉरमॅट हा शासनाकडूनच प्राप्त झालेला असल्याने आम्ही त्यात काही करू शकत नसल्याची हतबलता जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.

Web Title: shivsmarak inauguration presenty