esakal | 11 केव्ही तारेचा झटका; पाच कामगार बचावले
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर येथील अंबाजोगाई रस्त्यावर पथदिव्यांचे काम सुरू असताना 11 केव्हीच्या उच्चदाब वाहिनीच्या तारेचा पाच कामगारांना झटका लागला. यात हे पाचही कामगार बालंबाल बचावले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे. 

11 केव्ही तारेचा झटका; पाच कामगार बचावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथील अंबाजोगाई रस्त्यावर पथदिव्यांचे काम सुरू असताना 11 केव्हीच्या उच्चदाब वाहिनीच्या तारेचा पाच कामगारांना झटका लागला. यात हे पाचही कामगार बालंबाल बचावले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे. 


सध्या शहरात महापालिकेच्या वतीने ईएसएल कंपनीच्या वतीने पथदिवे दुरुस्ती व नवीन पथदिवे बसवण्यात येत आहेत. एलईडी स्वरूपाचे हे पथदिवे आहेत. मंगळवारी दुपारी येथील अंबाजोगाई रस्त्यावर दुभाजकात असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नवीन पथदिवे बसवण्याचे काम कंपनीच्या वतीने सुरू होते.

काही कामगार हे काम करीत होते. काम करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सीडीचा रस्त्यावरून गेलेल्या 11 केव्ही उच्चदाब वाहिनीच्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे सलीम मणियार, युसूफ मनियार, समिर मनियार, बिलाल मनियार व पप्पू शिंदे हे कामगार फेकले गेले.

या घटनेत ते बालंबाल बचावले. या कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक राजा मनियार यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन कामगारांची भेट घेऊन चौकशी केली. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील रुग्णालयात जाऊन या कामगारांची चौकशी केली.  

loading image
go to top